ताज्या घडामोडीफॅशन

तलवारीची धमकी देणारी दिव्या ‘बिग बॉस’ मधून आउट


7 फेब्रुवारी 2026

 

 

लोणावळा – ‘बिग बॉस मराठी 6’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदे हिला  घरातून बाहेर काढलं . रितेश देशमुख होस्ट असणाऱ्या बिग बॉस मराठीने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. सदस्यांच्या या ना त्या कारणाम्यांमुळे हा शो सतत चर्चेत आहे.

एका टास्क दरम्यान, दिव्या हिने स्पर्धक तन्वी हिला धमकी दिल्यानंतर घरातील वातावरण बिघडलं…तन्वी हिने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे दिव्या हिचा पारा चढला… त्यानंतर दिव्या हिने थेट तन्वी हिच्यावर तलवार चालवण्याची धमकी दिली… एवढंच नाही तर, बिग बॉसने दिव्याला स्वतःती चूक सुधारण्याची संधी  दिली. पण दिव्याने माफी मागितली नाही. अशात, इतर सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दिव्याला दंड म्हणून तातडीने घराबाहेर बाहेर काढलं. यामुळे दिव्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *