क्राईममहाराष्ट्रराजकीय

अशोक खरातच्या कॉल डिटेल्स मधुन अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं समोर,


 

मुंबई,

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’चा (CDR) हवाल्याने धक्कादायक माहिती सार्वजनिक केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत शेकडो कॉल झाल्याचा दावा करत दमानिया यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे

रूपाली चाकणकर चाकणकर यांचे अशोक खरातसोबत तब्बल 177 कॉल्स झाले आहेत. यात दोघांमध्ये एकूण 33 हजार 727 सेकंद संभाषण झाले होते.

  • रुपाल चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांचे एकूण 236 कॉल्स अशोक खरातला झाले होते.
  • राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील 17 कॉल्स यात 10 इनकमिंग, 7 आऊटगोईंग कॉल्स झाले होते. एकदा तर दोघांमध्ये तब्बल 21 मिनिटे सलग संभाषण झाल्याचा दावा दमानिया याने केला.
  • दीपक लोंढे (केसरकरांचे निकटवर्तीय) यांचे 189 कॉल्स असून दोघांमध्ये एकूण 39 हजार 589 सेकंद संभाषण झाले.
  • यासोबत भाजप नेते चंद्रकांत पाटील (8 कॉल), सुनील तटकरे (8 कॉल), आशिष शेलार (1 कॉल) यांचं देखील अशोक खरातसोबत संभाषण झालं आहे.

अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत, “एखाद्या भोंदू बाबाला राज्याचे उपमुख्यमंत्री 17 वेळा कॉल का करतात? त्यांच्यात 21 मिनिटे काय चर्चा झाली, हे जनतेला समजायला हवे. तसेच रूपाली चाकणकर इतका वेळ खरातशी काय बोलत होत्या? त्यांना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

दमानिया यांनी दावा केला आहे की, खरातला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कतार, युएई आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतूनही मोठ्या प्रमाणावर फोन आले आहेत. “हे केवळ नॉर्मल कॉलचे रेकॉर्ड आहेत, व्हॉट्सअॅप कॉल्सची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते,” अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *