मैत्रीण

मुलांचे मालक नाही,पालक व्हा – प्रा. शैलजा सांगळे….. बालेवाडीत रंगला ‘सुजाण पालकत्व’ हा विशेष कार्यक्रम


गर्जा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी,

बालेवाडी ता. 12/3/2026

 

अभितारा ग्रुप आणि तनिष्का व्यासपीठ यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून ‘सुजाण पालकत्व’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा शैलजा सांगळे यांनी यावेळी पालकत्वाच्या विशेष टप्यांचे विश्लेषण केले.

यावेळी प्रा. सांगळे यांनी अगदी सोप्या आणि गमतीशीर पद्धतीने पालकत्व या गंभीर विषयावर लक्ष वेधले. त्या म्हणाल्या आजकाल लहान मुलं देखील आत्महत्या करीत आहे. गेमचा विळख, ड्रुग्स चा विळख तसेच सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे मुलांच्या जडणघडणीत या सर्वांचा अडथळा सध्याच्या युगात आहे. आपण मुलांचे मित्र होऊन नक्कीच यावर मत करू शकतो  यसेच किमान दिवसभरात अर्धा तस हा फक्त मुलांशी बोलण्यात त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालबायला हवा यातून मुलांच्या भावना आपल्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोहचतात. क्वालिटी टाइम हा मुलांसाठी दिलाच पाहिजे. मुलांचे मालक न होता पालक होणं महत्वाचं आशा अनेक मुद्यांवर प्रा सांगळे यांनी भाष्य केलं.

 

या कार्यक्रमाचे आयोजन अभितारा ग्रुपच्या संचालिका उज्वला मेश्राम तसेच मैत्रीण ग्रुपच्या संचालिका ऋतुजा बालवडकर यांनी केले. तसेच यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी विशेष खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी यांनी केले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य मानसी हिरेकोडी तसेच समिना पठाण यांचे लाभले

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *