ताज्या घडामोडी

बिग बॉस फेम दीपाली सय्यद यांच्या घरातील सदस्याचं निधन


ऋतुजा बालवडकर, संपादक 

मुंबई -बिग बॉस मराठी सीझन 6 चर्चेत आहे. काही स्पर्धकांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या एका स्पर्धकाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही स्पर्धक आहे अभिनेत्री दीपाली सय्यद. दीपालीच्या कुटूंबातील सदस्याचं निधन झालं आहे. तिचा नवरा बॉबीने नुकतीच एका मुलाखतीत ही धक्कादायक माहिती उघड केली.

दीपालीचा नवरा बॉबी आणि मुलगा अली यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दीपालीची सासू आणि बॉबी यांची आई यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्याचं उघड केलं. ही बाब त्यांनी दीपाली यांच्यापासून लपवल्याचं सांगितलं.

बॉबी म्हणाले की,”नुकतंच माझ्या आईचं निधन झालं. माझी आई दीपालीच्या खूप जवळ होती. त्या दोघींचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ती दीपालीला मुलगी मानायची. तू बिग बॉस जिंकल्यानंतर मी नक्कीच येईल असं माझ्या आईने दीपालीला सांगितलं होतं. आई या जगात नाही हे सत्य अजून आम्ही दीपालीला सांगितलं नाहीये. ”

“सध्या ती खूप चांगलं खेळत आहे. जे झालं ते झालं. तिला आता कळलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल. ती हा धक्का सहन करू शकणार नाही. डॉक्टरकडे जायचं असेल तरीही माझ्या आईला दीपाली लागायची. दीपाली आईला सगळीकडे घेऊन जायची.”

“या कारणामुळे दीपालीची खूप आठवण येते. कारण सगळे निर्णय मला घ्यावे लागत आहेत. 2 फेब्रुवारीला माझ्या आईचं निधन झालं. दिपालीला आईबद्दल कळलं तर खूप मोठा धक्का बसेल. आई काहीच बोलायचं नाही तेव्हा आम्ही तिला दीपालीचा मोबाईलवरून आवाज ऐकवत होतो. दीपालीने कायम पुढे जावं असच माझ्या आईला वाटायचं.” असं ते पुढे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *