ताज्या घडामोडी

समुद्रपूर येथे ‘दादा’ यांना सर्वपक्षीय आदरांजली


समुद्रपूर येथे ‘दादा’ यांना सर्वपक्षीय आदरांजली
झेंडा चौकात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन, शहरात शोकमय वातावरण

समुद्रपूर प्रतिनिधी :  येथील झेंडा चौकात ‘दादा’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर शोकमय वातावरणाने भारलेला होता.

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. हिंमतराव चतुर होते. यावेळी समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर, नगराध्यक्ष योगिता तुळणकर, नायब तहसीलदार अजय झिले यांच्यासह महेश झोटिग, प्रमोद भटे, रामकृष्ण खुजे, गुणवंता कोठेकर, जयंत तिजारे, उल्हास कोटमकर, गजानन राऊत, मेघश्याम ढाकरे, अशोक वांदिले, रमेश भोयर, गजानन दुर्गे, विनोद हिवंज, रवी धोटे, प्रदीप डगवार, सुरेश जवादे, हेमंत पाहुणे, पिंटूभाऊ बादले, गजानन पारखी, सचिन तुळणकर, बाबरावजी थुटे, महेंद्र शिरोडे, किशोर आस्कर, विलास वैद्य, नितीन सरोदे, पवन मुळे, अभी गिरडकर, पंकज लाटकर, अमित लाजुरकर, रंजित चावरे, अमोल सायंकार, सौरव साळवे, मधू कामळी, राम काळे, रवी लढी, शेषराव तुळणकर, पुरुषोत्तम सालवटकर, मनीष गांधी, इंद्रपाल ढोरे, सौरभ तुपे, श्रीकांत पाणेकर, प्रशांत अबागडे, राहुल लोहकरे, रजत भुरे, आकाश वलके, समीक्षा मांडवकर, शीला सोनारे, सीमा काळे, सरिता लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांनी अजित दादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांच्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमात समुद्रपूर तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन घडवणारी ही शोकसभा शहरासाठी भावनिक आणि ऐतिहासिक ठरली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *